गुन्हा दाखल होताच प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी “माझ्यावर करण्यात आलेली कारवाई हि सूड बुद्धीने करण्यात आलेली असल्याची प्रतिक्रिया दिली.

मुंब्रा बँक मजूर घोटाळा प्रकरणी नुकताच प्रवीण दरेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, काल देवेंद्र फडणवीस यांनीही सभागृहात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती दिली होती. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आम्हाला कल्पना होती. आणि आज माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. आम्ही न्यायालयात याबाबत दाद मागणार आहोत.

माझ्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती सूड भावनेने करण्यात आलेली आहे. विविध माध्यमातून गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. मात्र, अशा प्रकारे कोठेही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. माझ्यावर मुंब्रा बँक मजूर घोटाळा प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांना रीतसर पद्धतीने मी सविस्तर पद्धतीने सांगेन. माझ्यावर करण्यात आलेली कारवाई या मागे काहीतरी षडयंत्रच असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी यावेळी केला.