सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
जावळी तालुक्यातील करहर येथे भाजपाच्या संपर्क कार्यालयाचे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी “कार्यकर्ता हे पक्षाचे बलस्थान आहे. या करिता कार्यकर्त्यामध्ये मिसळून स्वतः कार्यकर्ता झालं तर कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन पक्षकार्य जोमात होते. याच माध्यमातून गावोगावच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेऊन सोडविण्यास प्राधान्यकर्म दिला जात आहे, असे दरेकर यांनी म्हंटले.
यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, “मी स्वतः प्रथम कार्यकर्ता असून कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देत आहे. जनसंपर्क कार्यालयातून लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविणे अपेक्षित आहेत. याकरिता काही मदत लागल्यास मी स्वतः आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन.”
भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांनी महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेती, पिण्याच्या पाण्याची दुरवस्था, घरांची, रस्ते पडझड याबाबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या कानावर घालून सरकार दरबारी पाठपुरावा करावा, अशी गळ घातली. दरेकरांनी या प्रश्नी लक्ष घाल्याची आश्वासन दिले.
यावेळी श्रीहरी गोळे, तालुका अध्यक्ष,रवी परामने माजी सभापती,भाजप, सयाजी शिंदे, जिल्हासरचिटणीस, तानाजी भिलारे, , किरण भिलारे, तालुका उपाध्यक्ष, भानुदास ओंबळे, गणेश पार्टे, ता. सरचिटणीस, प्रदीप बेलोशे, ता. सरचिटणीस, भाईजी गावडे, प्रमिला गोळे, सरपंच हातगेघर, विनोद वेंदे शहर अध्यक्ष मेढा, प्रमोद शिंदे, मोनिका परामने, युवती मोर्चा, शंकर गोळे, उपसरपंच, रोहिदास भालेघरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांची घेतली भेट
जावळी येथील कार्यक्रमप्रसंगी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. दोघांच्या भेटीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. “आमची शालेय मैत्री असल्याने मित्राला भेटलो यामध्ये कोणतेही राजकारण नाही,” असे उत्तर भेटीमागचे दरेकर यांनी दिले.