हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान काल राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी., असे दरेकर यांनी म्हटले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. कृपया, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 5, 2022
आतापर्यंत राज्याचे मोठ्या मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.