हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. दरम्यान त्यांनी तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत, असा टोलाही लगावला.
भाजपनेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून कधी महाविकास आघाडी सरकार तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. आज दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून एसटी कर्मचारी व शिक्षक यांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी केली आहे.
तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात.
कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा. @CMOMaharashtra @advanilparab एसटी कर्मचा-यांना न्याय मिळवून द्या!— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 21, 2021
दरेकरांनी पत्रात म्हंटल आहे की, कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी. शाळा बंद असल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांची परिस्थिती विदारक असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे.
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू होईपर्यंत विनाअनुदानित शाळेतील सुमारे 50 हजार शिक्षकांच्या कुटुंबांना तातडीने मदत करण्यात यावी, यासाठी @CMOMaharashtra मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांना पत्र लिहिले आहे. pic.twitter.com/h8x7gVNOZW
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 21, 2021
तसेच शिक्षकांच्या कुटुंबियांबद्दलच्या मागणी बरोबर दरेकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीबाबतही विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसेच तात्पुरती ठिगळं लावून एसटीचे कर्मचारी सुखी होणार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कर्मचारी आजही उपासमारीत जगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीच कायमस्वरूपी मार्ग काढायला हवा, असे म्हंटले आहे.