हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू असून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींकडे बोट दाखवल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. हुकूमाची पानं मोदींच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला.
संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही असा टोला त्यांनी लगावला. तसेच भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले-
महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असं राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.