हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Prepaid Plans : सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक सादर करत आहेत. देशातील मोठ्या कंपन्या असलेल्या Jio आणि Airtel देखील ग्राहकांसाठी एकाहून एक जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहेत. आजकाल बहुतेक प्लॅन्सवर फ्री कॉलिंग दिले जाते आहे. मात्र सध्याच्या काळातील OTT प्लॅटफॉर्मचा वाढता ट्रेंड पाहता टेलिकॉम कंपन्या देखील Disney + Hotstar चे बेनेफिट्स असलेले प्लॅन ऑफर करत आहेत. जर आपल्याला जास्त डेटा, कॉलिंग आणि Disney + Hotstar चे बेनेफिट्स मिळत असलेला प्लॅन हवा असेल तर Jio आणि Airtel चे खाली दिलेले प्लॅन्स तपासा.

जिओचा 1499 रुपयांचा प्लॅन
हे लक्षात घ्या कि, जिओ कडून ग्राहकांना 1499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर केला जातो. यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत डेली 2 GB डेटा आणि डेली 100 एसएमएसही दिले जातात. यासोबतच ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभही मिळेल. या प्लॅनच्या इतर फायद्यांबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना Disney + Hotstar चे एक वर्षाचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय ग्राहकांना जिओ सिनेमा, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी यांसारख्या सर्व जिओ ऍप्सचा एक्सेस देखील मिळतो. Prepaid Plans

जिओचा वार्षिक प्लॅन
जिओच्या दुसऱ्या प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास कंपनीकडून ग्राहकांना 4199 रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅन ऑफर केला जातो. यामध्ये ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तसेच यामध्ये ग्राहकांना 84 दिवसांसाठी डेली 2 GB डेटा देखील दिला जातो आहे.
याशिवाय ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील दिले जातात. यासोबतच डिस्ने + हॉटस्टारचे एक वर्षाचे फ्री सबस्क्रिप्शन आणि सर्व जिओ ऍप्स देखील फ्री मध्ये मिळतील. Prepaid Plans

Airtel चा Disney+ Hotstar प्लॅन
दुसरीकडे, Airtel च्या प्लॅनबाबत बोलायचे झाल्यास कंपनीचा सर्वात स्वस्त OTT प्लॅन 181 रुपयांच्या किंमतीसह येतो. यामध्ये ग्राहकांना डेली 1 GB डेटा सोबत 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यासोबतच ग्राहकांना 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. मात्र एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, कारण ते क्रिकेट पॅक अंतर्गत सादर करण्यात आले आहे. Prepaid Plans

Airtel च्या ‘या’ प्लॅन्समध्ये देखील Disney + Hotstar
-181 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 1GB डेटा मिळेल, जो 3 महिन्यांसाठी व्हॅलिड असेल.
-399 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2.5GB मिळेल, जो 28 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.
-839 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी डेली 2GB डेटा मिळेल, जो 3 महिन्यांसाठी व्हॅलिड असेल.
-499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी डेली 2GB मिळेल, जो एक वर्षासाठी व्हॅलिड असेल.
-2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळेल, जो 365 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.
-599 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा मिळेल, जो 365 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.
-3,359 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेली 2.5GB डेटा मिळेल, जो 365 दिवसांसाठी व्हॅलिड असेल. Prepaid Plans
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.jio.com/selfcare/plans/mobility/prepaid-plans-home
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा




