हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपविरोधातील देशभरातील विरोधकांच्या INDIA ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन मुजाहिद्दीन आणि ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे. “नावात भारत किंवा भारतीय जोडून कोणीही भारतीय होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही ‘INDIA’ नाव लावलं होतं. इंडियन मुजाहिदीनच्या नावातही ‘INDIA’ आहे” असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. आज पार पडलेल्या भाजपच्या संसदीय बैठकीत बोलताना मोदींनी ही टीका केली आहे.
मोदी म्हणाले, सध्या विरोधी पक्ष विखुरलेला आणि हताश आहे. विरोधी पक्षांचे काम आंदोलन करणं असून तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या” असं आवाहन मोदींनी आपल्या खासदारांना केले यावेळी आहे. त्याचबरोबर, विरोधी पक्षाच्या आघाडीला दीर्घकाळ सत्तेत येण्याची इच्छा दिसत नाही. त्यांना नेहमीच विरोधी बाकांवर बसायच आहे. तसेच ते 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवायच म्हणत आहेत. यातूनच विरोधी पक्ष पूर्णपणे दीशाहीन दिसत असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हणले आहे.
दरम्यान मणिपूरमध्ये घडलेल्या जातीय हिंसाचाराला ७० दिवस उलटून गेले असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर काहीच ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या हिंसाचारावर नरेंद्र मोदींनी भाष्य करावे अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून सतत होत आहे. या पार्श्वभूमीवरच आज काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर संसदीय सभागृहात हल्लाबोल केला. गेल्या कित्येक दिवसांपासून सभागृहात आम्ही मणिपूर हिंसाचाराबद्दल बोलत आहोत. परंतु सभागृहाच्या बाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘INDIA’ ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणत आहेत. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून भारत मातेबरोबर राहिला आहे. भाजपाचे राजनैतिक वंशज हेच इंग्रजांचे गुलाम होते” अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर केली.