हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून पटोलेंच्या विधानानंतर सुरुवातीला कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आज काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “ठीक आहे, भाजप विरोधात आहे. भाजपला विरोधीपक्ष असल्यामुळे आंदोलन करावे लागेल. मात्र, आम्ही आमचे काम करत राहू,” असे चव्हाण यांनी यावेळी म्हंटले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम हे काँग्रेस पक्ष पक्षाच्या पद्धतीने करत आहे आणि हे होत राहील. मग सरकारमध्ये असले आणि नसले तरी आम्ही सामान्य माणसांचे प्रश्न उपस्थित करत राहू. कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. पटोले यांनी त्यांनी पंतप्रधानांबाबत जे काही वक्तव्य केले आहे त्या केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी तसे स्पष्टीकरण दिले आहे.”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज दिवसभर भाजपकडून पटोलेंच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यातील काँग्रेसही चांगलीच आक्रमक झाली असून पटोले यांच्या या व्हिडीओवरून भाजपकडून जोरदार हल्ला चढवला जात आहे.