हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान आघाडीत बिघाडी झाली असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळाल्या. मात्र, असे काहीच नाही असे आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे नेते तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील विजयाबाबत आणि मताच्या फुटीबाबत मोठे विधान केले. या निवडणुकीत विजय हा आमचाच होणार आहे. महाविकास आघाडीतील एकही मत हे बाद झालेले नाही, असे चव्हाण याणी म्हंटले आहे.
मतदान केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज राज्यसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी मतदान केले. यावेळेस महाविकास आघाडीतील एकहि मत हे बाद झालेले नाही. तसर्वांची मते हि ग्राह्य ठरण्यात आली, असे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान आता नुकतीच राज्यसभाईच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया हि नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे आता सायंकाळी पाच वाजता मतमोजणी हि केली जाणार आहे. त्यामुळे योग्य तो काय निकाल पाच वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहार. मतदानानंतर आता मतमोजनीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.