कितीही दावे केले तरी महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येणार; जयंत पाटलांचे भाजपला प्रत्युत्तर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहा जागेसाठी सध्या चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपकडून आपलाच गुलाल उडणार असे बोलले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपाने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पाटील व्यक्त केला.
मुंबईत राज्यसभेसाठी मतदान होत असून मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. राष्ट्रवादीत व शिवसेनेत मतांच्या वाट्यावरून नाराजी असल्याचे रकायला मिळत आहे मात्र, आपच्यापैकीकुणाची नाराजी नाही. सर्व संपर्कात आहेत.
सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज होत या निवडणुकीत महाविकास आघाडीचे आमदार अस्थिर व्हावेत हा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे तशा स्वरूपाच्या बातम्याही पेरल्या आहेत, पण कोणताही आमदार अस्थिर होणार नाही अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो. पण आमची बेरीज पाहिली तर आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत, असे पाटील यांनी म्हंटले.