हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC कडून नुकतेच रेल्वे तिकीटच्या बुकिंगचे नियम बदलले गेले आहेत. आता या नवीन नियमांनुसार एका युझरला IRCTC च्या साईटवर एका महिन्यात दुप्पट तिकीट बुक करता येईल. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंगची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठा फायदाच होणार आहे. मात्र, इथे लक्षात घ्या कि प्रत्येक युझरला याचा फायदा घेता येणार नाही. आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की ज्या युझर्सनी आपले आधार कार्ड आयआरसीटीसीखात्याशी लिंक केले आहे त्यांनाच डबल तिकिट बुक करता येईल.
यापूर्वी, ज्या युझर्सनी आपले IRCTC खाते आधारशी लिंक केले नव्हते त्यांना एका महिन्यात जास्तीत जास्त 6 ऑनलाइन तिकिटेच बुक करता येतील. मात्र आधारशी लिंक आयआरसीटीसीखाते असलेल्या युझर्सना एका महिन्यात 12 तिकिटे बुक करता येतील. मात्र आता IRCTC कडून या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. आता एका आधार लिंक्ड आयडी द्वारे एका महिन्यात 24 तिकिटे बुक करता येतील. जर आपण आपले आधार कार्ड आयआरसीटीसीशी लिंक केले नसेल तर एका महिन्यात फक्त 12 तिकिटेच बुक करू शकाल.
अशा प्रकारे करा लिंक
IRCTC आयडीशी आधार लिंक करणे हे फारसे अवघड काम नाही. आता हे काम घरबसल्या अगदी सहजने करता येई. चला तर मग त्याविषयी जाणून घ्या …
आयआरसीटीसीखात्याला आधारशी लिंक करण्यासाठी, सर्वात आधी http://www.irctc.co.in वर जा आणि येथे लॉगिन डिटेल्स भरा.
यानंतर MY ACCOUNT या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर Link Your Aadhar या पर्यायावर क्लिक करा.
आता आपला आधार नंबर आणि व्हर्च्युअल आयडीची माहिती द्या.
यानंतर, चेक बॉक्सवर जा आणि Send OTP चे बटण दाबा.
आता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
यानंतर, व्हेरिफिकेशन बटणावर जा आणि आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अपडेट बटणावर क्लिक करा.
KYC पूर्ण झाल्यानंतर, IRCTC लिंक केले जाईल.
ईमेलवर कन्फर्मेशन लिंक मिळाल्यानंतर लॉग-आउट करा.
येथे आपले स्टेट्स देखील तपासता येईल.
आता आयआरसीटीसीवेबसाइटवर लॉग आउट करून आणि पुन्हा लॉग इन करून तिकीट बुक करू शकता.
हे पण वाचा :
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ, नवीन दर पहा
Housing loan : आता LIC हाऊसिंग फायनान्सनेही होम लोन वरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले
EPFO: नोकरी बदलल्या नंतर PF ट्रान्सफर करावा हे समजून घ्या
Gold : पुढील पाच दिवस स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, कसे ते जाणून घ्या