मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे.
मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर ७ लाख ३ हजार एवढी मुख्ह्यमंत्र्यांची घरपट्टी थकीत आहे. त्यामुळे यावरून देखील महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नेहमी कार्यक्षमतेची टिमकी वाजवता तर मग एवढी कराची रक्कम का थकवतात असा सवाल देखील सर्व सामान्य लोकांमधून विचारला जाऊ लागला आहे.
दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या घराची पाणीपट्टी आपण भरणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांवर राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना अंघोळीला आणि तोंड धुण्यास उशीर होऊ नये असे म्हणून मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली होती.