पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्रात प्रत्येक आठवड्यात सरासरी एका सेक्स रॅकेटचा पर्दा फाश होण्याचा प्रकार घडत आहे. आज बुधवारी सकाळी १० च्या सुमारास असाच एक प्रकार सुसंस्कृत पुण्यात उघडकीस आला आहे. नांदेड सिटी जवळील एका मसाज सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे पोलीस छाप्यातून उघड झाले आहे. या छाप्यात पोलीसांनी पाच विदेशी तरुणींची सुटका केली आहे. त्याचप्रमाणे या मसाज सेंटरच्या मालकाला देखील अटक केली आहे.
उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवार म्हणतात
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आर्चिड फाइड’ स्पा मसाज सेंटरमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालू असल्याची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी छापा टाकण्याचा सापळा लावला. आमच्यातील एक माणूस ग्राहक बनून आत गेला आणि त्याने सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती खरी आहे का याची खात्री केली. त्याची खात्री पटल्यानंतर आम्ही थेट आत शिरलो आणि या मसाज सेंटरच्या मालकाला अटक केली आणि मुलींची सुटका देखील केली असे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच प्रमाणे थायलंड वरून या ठिकाणी मुली आयात केल्या जात होत्या असे देखील पोलीस तपासातून उघड झाले आहे.
हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ; इंदापूर काँग्रेसला द्यायला राष्ट्रवादीचा नकार
या छाप्यात पोलिसांनी मसाज सेंटर व्यवस्थापक अक्षय रामेश्वर ससेमल याला अटक केली आहे. त्याच प्रमाणे त्याचा साथीदार असणाऱ्या कादर शेखचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून या मसाज सेंटरमध्ये असेही प्रकार चालत होते का? असा आश्चर्यकारक सवाल येथील नागरिक विचारू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
राष्ट्रवादीचा हा माजी खासदार करणार भाजपमध्ये प्रवेश
पी.चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
राज ठाकरेंना ईडीची नोटीस येणार हे मला आधीच माहित होतं : प्रकाश आंबेडकर
Breaking |राष्ट्रवादीला महाधक्का ; छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर
गोपीचंद पडळकर वंचितला ठोकणार रामराम ; या पक्षात करणार प्रवेश
विजय शिवतारेंना हृदयविकाराचा झटका