बनावट नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारच संरक्षण; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्ड शी संबंध असून आपण हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलं. बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला तसेच फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुंडांना मोठ्या पदावर बसवले असेही नवाब मलिक यांनी म्हंटल.

अंडरवर्ल्ड लोकांना तुम्ही आयोगावर अध्यक्ष बनवलं. नागपूर चा गुंड ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे त्या मुन्ना यादवला कन्ट्रक्शन बोर्ड चे अध्यक्ष का केलं?? हैदर आझम ला मंडळाचा अध्यक्ष का केलं ?? असे एकामागून एक सवाल नवाब मलिक यांनी फडणवीस यांना केले.

फडणवीस यांच्या कडून नोटा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न-

बनावट नोटांच्या रॅकेट ला फडणवीस सरकारच संरक्षण होत असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. नोटबंदी ने काय साध्य झाले….देशभरात बनावट नोटा जप्त झाल्या, पण महाराष्ट्रात बनावट नोटा जप्त झाल्या नाहीत, ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोटा पकडण्यात आल्या नाही. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. ८ ऑक्टोबर २०१७ १४ कोटी ५६ बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

रियाझ भाटी हा दाऊदचा माणूस, मोडींसोबत फोटो कसे??

मलिक म्हणाले की, बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला पकडलं होतं. रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे . देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.  पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.  पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत. एखादा गुंड, क्रिमीनल सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा असा सवाल मलिक यांनी केला आहे.