पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर फिरणाऱ्या अशाच एका नागरिकाला प्रशासनाने चांगलीच अद्दल घडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प भागात एक नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी गाडीवरुन फिरत होता.फिरत होता. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या पुणेकराविरोधात ११ एप्रिलला FIR दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत कोर्टात हजर केलं. कोर्टाने सदर आरोपी पुणेकराला दोषी ठरवत करत त्याला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळं पुणेकरांनी घराबाहेर पडताना मास्क किंवा रुमाल बांधूनच बाहेर पडावं अन्यथा जेलची हवा आणि दंड याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पुण्याप्रमाणेच मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर महानगरात सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधाकरक केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”