पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; भींतीवर पोलिसांसाठी लिहिला ‘हा’ संदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । शहरातील एकाच कुटुंबातील चौघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे येथील सुखसागर येथे हा प्रकार घडला असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या करत भीतीवर पोलिसांसाठी एक संदेश लिहिला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (३३ वर्ष), जया अतुल शिंदे (३२ वर्ष) अशी सदर दाम्पत्याची नावे आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, अतुल आणि जया यांचा २०१३ साली प्रेमविवाह झाला होता. त्यांना ऋग्वेद अतुल शिंदे ( ६ वर्ष) आणि अंतरा अतुल शिंदे ( ३ वर्ष) अशी दोन अपत्ये होती. गुरुवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनेक दिवस घर बंद असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळवले असता भरती विद्यापीठ पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता अतुल शिंदे यांचा आयकार्ड बनवण्याचा व्यवसाय असल्याचे समजले.

image-2020-06-19T101715.657

यावेळी पोलिसांना गळफास घेतल्या घोलीतच भीतीवर एक संदेश लिहिलेला सापडला आहे. यामध्ये ‘कृपया पोलिसांनी कोणालाही त्रास देऊ नये. आम्ही आमच्या मर्जीने परिस्थितीला कंटाळून स्वतःला संपवत आहोत’ असे लिहिले आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे सदर दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”