पुण्यात नगरसेवकाकडून ४ हजार कुटुंबांना धान्य वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू आहे. अशा परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्या लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन वेळच्या जेवणाची त्यांना भ्रांत पडली आहे. अशावेळी पुण्यातील ४ हजार कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. गुलटेकडी भागातील डायस प्लॉट, मीनाताई ठाकरे वसाहत, संदेशनगर एसआरए झोपडपट्टीत आदी भागात हे धान्य वाटप करण्यात आलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने एकूण ४ हजार कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. प्रभाग २८ मधील भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे यांनी पुढाकार घेत झोपडपट्टीतील प्रत्येक घरात जाऊन किराणा माल, धान्य वाटप केले.

यामध्ये कुटुंबाला ३ किलो तांदूळ, १ किलो डाळ, १ किलो साखर, १ किलो तेल, ५०० ग्रॅम मीठ, ५० ग्रॅम जीरा अशा प्रकारचे किट तयार करण्यात आले आहे. झोपडपट्टीतील अनेक कुटुंबाना या किटचा काही दिवसांसाठी आधार बनला असल्याची भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. सदर भागात धान्यवाटप करताना माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका कविता भरत वैरागे, स्वीकृत सदस्य रमेश बिबवे, चेतन चावीर, गणेश शेरला, जावेद शेख, सुशिल लोंढे, सतीश काळे, अक्षय खिलारे, शंकर चोरगे, प्रशांत लोंढे आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली ७८१ वर

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

करोना फोफावतोय; पिंपरी-चिंचवडमध्ये १९, तर मुंबईत ११ जणांना संसर्ग

कोरोनापासून वाचण्यासाठी घरच्या घरी ‘असा’ बनवा मास्क

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

 

Leave a Comment