हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील कर्मचार्यांच्या १०८ सदस्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले असून त्यामध्ये डॉक्टर आणि परिचारिकादेखील आहेत. या सदस्यांचा दुसऱ्या चाचणी अहवालात कोरोना विषाणूची लागण झालेल्या २ अशा रूग्णांशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे.
या रुग्णालयातील १०८ सदस्यांपैकी ८५ जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, तर २३ जणांना रुग्णालयात ठेवले गेले आहे.३ एप्रिल पर्यंत कोरोना विषाणूची ३८६ प्रकरणांच्या पुष्टी झाल्या आहेत. या एकूण प्रकरणांपैकी २५९ प्रकरणे तबलीगी जमात कार्यक्रमाशी संबंधित आहेत. राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३ एप्रिल रोजी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे २६५० रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ जणांना लागण झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले आहेत. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी
भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?
दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण