हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्रेटर नोएडाच्या गॅलगोटिया कॉलेजमध्ये क्वारंटाइन ठेवलेल्या घरात कोरोना संसर्ग झाल्याचा संशयित एका युवकाने रविवारी सायंकाळी सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनेनंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क पोलिस स्टेशन परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरुण अनेक दिवसांपासून केंद्राच्या प्रभारींकडून त्याचा तपासणी अहवाल मागत होता.परंतु त्याला अहवाल देण्यात आला नाही. त्या युवकाने अगदी आपल्या गावाला जाण्याचा प्रयत्नदेखील केला होता. पीडित युवक हा मानसिक तणावात आला होती.त्यामुळे, रविवारी सायंकाळी त्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, सध्या या युवकाच्या मृत्यूबद्दल जिल्हा व पोलिस प्रशासनाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जाहीर केलेले नाही. हे क्वारंटाइन सेंटर जिल्हा प्रशासनानेच बांधले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा तपास अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी (प्रशासन) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मेलेला तरूण सुमारे ३२ वर्षांचा होता. गॅलगोटिया कॉलेजमधील या क्वारंटाइन सेंटरकडून अनेक गंभीर तक्रारी येत असल्याची माहिती मिळाली आहे. येथे उपस्थित कर्मचार्यांचे रूग्णांशी वागणेही चुकीचे होते. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने मात्र या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
कोरोना विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिका ते ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन पर्यंत हे सर्वच देश कोरोनाच्या कहरात हतबल झालेले दिसत आहेत.त्याप्रमाणेच कोट्यावधी लोकांना अजूनही या विषाणूचा धोका असेल आणि १ लाख १४ हजारांहून अधिक लोक आपला जीव गमावतील अशी बीटीही व्यक्त केली जात आहे. भारतातही या विषाणूमुळे ३०८ लोकांचा बळी गेला आहे तर ९००० हून अधिक लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.