नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा काही पत्रकारांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी गांधी यांनी केंद्र सरकारच्या सेन्ट्रलाइझ कामकाज पद्धतीवर टीका करत केंद्राने राज्य सरकारांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. तेव्हा केंद्राने महाराष्ट्राला मदत करणे देशासाठी गरजेचे असल्याचे मत यावेळी राहुल यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र हे अद्वितिय राज्य; केद्राने राज्यांना मदत करायला हवी – राहुल गांधी#HelloMaharashtra @prithvrj @INCMumbai @INCMaharashtra @RahulGandhi @NitinRaut_INC #HelloMaharashtra pic.twitter.com/pK9v9w9quo
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) May 16, 2020
महाराष्ट्र एक मोठे राज्य आहे. आणि महाराष्ट्र हे नुसते मोठे राज्य नसून ते एक अद्वितीय राज्य आहे. महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोरोना काळात केंद्र सरकारकडून सहायय मिळणे गरजेचे आहे. सर्वच राज्यांना केंद्र सरकारने मदत करणे महत्वाचे आहे. कारण सरकार जेवढी मदत राज्यांना करेल तेवढा देशाला त्याचा फायदा होईल. राज्यच कोविड विरुद्धची लढाई लीड करू शकतात असे म्हणत राहुल यांनी केंद्र सरकार ला कामकाज पद्धतीत विकेंद्रीकरण करण्याचा सल्ला दिला.
I have heard that the reason behind not giving money is ratings. It is being said that if we increase our deficit today, the foreign agencies will downgrade our ratings: Rahul Gandhi, Congress https://t.co/BvKhzUf83O
— ANI (@ANI) May 16, 2020
दरम्यान, केंद्र सरकारचे काम हे मॅनेजमेंट करणे आहे तर राज्यांचे काम हे ऑपरेशन करणे आहे. सध्या अशी तक्रार येत आहे कि केंद्र सरकार राज्यांना जेवढी आर्थिक मदत करायला हवी तेवढी करत नाहीये. केंद्र सरकार कोविडची सेन्ट्रलाइझ पद्धतीने लढू पाहत आहे. मात्र मला वाटत कि हि लढाई राज्यांना मदत करून लढायला हवी आहे. असाही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
LIVE! Regional Electronic Media Press Conference. https://t.co/Yz65SxSqqC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”