हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. कन्याकुमारी पासून सुरु झालेली ही यात्रा १५० दिवसात काश्मीर पर्यंत जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट जनतेशी जोडले जात आहेत. याच दरम्यान, राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
भारत जोडो यात्रेच्या 11व्या दिवशी एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी स्वतः एका लहान मुलीला चप्पल घालण्यास मदत करताना दिसत आहेत. राहुल गांधींच्या हातात हात देत ती मुलगी चालत होती. त्याच वेळी तिचे सॅन्डल पायातून निघाले आहे हे राहुल यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्कळ थांबत त्या मुलीला तिचा सॅन्डल घालण्यास मदत केली . महिला काँग्रेसच्या कार्यवाहक अध्यक्ष नेट्टा डिसोझा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “साधेपणा आणि प्रेम. देशाला एकत्र ठेवण्यासाठी या दोन्ही गोष्टींची गरज आहे.” असं कॅप्शन त्यांनी दिले.
सादगी और प्रेमभाव 💕
देश को एकजुट रखने के लिये दोनों चाहिए। #BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/txkM2AQNYU
— Netta D'Souza (@dnetta) September 18, 2022
या व्हिडिओ नंतर अनेक नेटकऱ्यानी राहुल गांधी यांच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. . हम कदम से कदम मिला रहे हैं. प्रत्येकाच्या अडचणी कमी करून, प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जात आहोत, कारण आम्ही प्रत्येकाला आपले मानतो, त्यांची काळजी कशी घ्यायची हे आपल्याला माहीत आहे असे राहुल गांधींनी म्हंटल