Wednesday, February 8, 2023

तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त? राहुल गांधी मोदींवर कडाडले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेषाचे राजकारण सुरु केलं आहे. भावाभावांमध्ये भांडण लावायचं काम केलं आहे. देशात भावाभावात भांडण लावल्यास देशाचे नुकसानच होणार आहे. मग जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणत असाल तर तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त आहात असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून यावेळी एका सभेला संबोधित करताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला . मोदी आणि आरएसएस देशात द्वेष निर्माण करतात. भावाभावांत, जाती – जातींमध्ये, भाषे- भाषेत, धर्मा- धर्मात द्वेष निर्माण करत आहेत आणि स्वतःला देशभक्त समजत आहेत. तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणता तर तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त आहात असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला. या देशाचे तर भक्त तुम्ही असू शकत नाही असेही ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, भारत जोडो यात्रेला २ महिने पूर्ण झाले आहेत पण असं वाटत आहे कि आजपासूनच सुरुवात केली आहे. रोज आम्ही २५ किलोमीटर चालत आहोत. ७-८ तसंच प्रवास करतोय पण आम्हाला थकवा जाणवत नाही. याच कारण म्हणजे तुमचं प्रेम आम्हाला बूस्ट देत आहे. तुमचं हेच प्रेम आम्हाला श्रीनगर पर्यंत पोचवणार आहे. असं राहुल गांधी म्हणाले.