व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

16 आमदार अपात्रतेच्या कारवाईला वेग; विधानसभा अध्यक्षांनी उचलले मोठं पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्ष अंतिम वळणावर आला आहे. शिंदे गटातील  १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला चांगलाच वेग आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसनेच्या ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. तसेच या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच राहुल नार्वेकर ऐतिहासिक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. त्यासाठी नार्वेकर याना कोर्टाने ९० दिवसांचा कालावधी दिला होता. यातील निम्म्याहुन अधिक दिवस झाले आहेत मात्र तरीही याबाबत कोणतेही ठोस पाऊस राहुल नार्वेकर यांनी उचललं नव्हतं. यानंतर ठाकरे गटाने ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आली होती. अखेर राहुल नार्वेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत शिवसनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावली आहे.

यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी कोर्टाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची प्रत मागितली होती. ती परत मागील आठवड्यात त्यांना मिळाली आहे. यानंतर आता आम्ही लवकरच याबाबत सुनावणी सुरु करु असं नार्वेकर यांनी म्हंटल होते. तेव्हाच ते येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतील हे स्पष्ट झालं होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार कि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती निराशा येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे.