हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वसाधारणपणे संसदेचं पावसाळी अधिवेशन दरवर्षी जुलै महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात सुरु होते. आणि ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अधिवेशन संपते. मात्र, यंदा संसदेचे अधिवेशन 18 जुलै ते 12ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार यात शंका नाही.
संसदेचे पावसाळी अधिवेशनासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने तशी शिफारस केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणे अपेक्षित आहे. अर्थसंकप्लीय अधिवेशनात संसदीय समित्यांकडे छाननीसाठी पाठविली गेलेली 4 विधेयके व प्रलंबित राहिलेली अन्य विधेयके या अधिवेशनात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेते राहूल गांधी व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून करण्यात आलेली चौकशी या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवाशनात कॉंग्रेस आक्रमक पवित्र घेणार यात शंका नाही.
तसेच अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, शेतकर्यांच्या समस्या आदी मुद्यांवरूनही विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होत आहे. आणि याच दिवसापासून अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात काय होणार? विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना पुन्हा धारेवर धरले जाणार का? कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा केली जाणार, हे पहावे लागणार आहे.