नवी दिल्ली | राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांच्याशी अर्धा तास महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आणि काँग्रेसचे संबंध चांगले सुधारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. भाजप सरकार घालवण्यासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेसची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
राज ठाकरे यांना सोबत घ्यायला महाराष्ट्रातील काँग्रेसचे स्थानिक नेते उत्सुक नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्या भेटी दरम्यान कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली. ते मुद्दे गुलदस्त्यात आहेत.
दरम्यान राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवर लोक शंका घेत असल्याने ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांना केली आहे. मात्र आपल्या मागणीवर निवडणूक आयुक्त कसल्याही प्रकारे गंभीर असल्या सारखे वाटले नाहीत असे राज ठाकरे म्हणाले आहेत.