परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज ठाकरेंनी केली ‘ही’ मागणी

Raj Thackeray and Anil Deshmukh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिण्याला 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. यानंतर आता विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी. अशा आशयाचे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गृहमंत्री अनिल देशमुखांनी तात्काळ राजीनामा द्याचा अशी मागणी केली आहे. तसेच भाजपच्या केंद्रीय समितीनेही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.