पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीला धारेवर धरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नात्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच केलं.
“निवडणुकीनंतर कोण कुणाकडे गेलं, कुणी सत्ता स्थापन केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्रात जे काही राजकारण झालं तो महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. आता महाविकासआघाडीचा प्रयोग राज्यभर होणार की कुठं हे बघू. आधी त्यांचा हनिमून पिरीयड संपू द्या.”असे राज म्हणाले.
निवडणुकीसाठी ज्या नेत्यांनी पक्षांतर केलं, त्यांना जनतेनं पाडलं. निवडणुकीच्या काळात ही खूप चांगली गोष्ट दिसली. मात्र, त्यानंतरही या लोकांनी सत्तेसाठी प्रतारणा करावी हे वाईट आहे. लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा परिणाम पुढील निवडणुकीच्या मतदानावरही होऊ शकतो, असंही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या –
फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती
एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर – शरद पवार
उपमुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय शरद पवार घेतील – अजित पवार
भारत धर्मशाळा आहे का?; राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल
अजित हार्ड वर्कर, प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची त्याच्यात क्षमता – शरद पवार