लाव रे तो व्हिडीओला निवडणूक आयोग म्हणतो दाखव सभांचा खर्च

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी|लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली वेगळी राजकीय दहशतच निर्माण केली होती.मात्र आता त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकी दरम्यान घेतलेल्या सभांचा खर्च मागितला आहे. या संर्दभात माध्यमांना राज्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.

लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार

ज्यावेळी राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या काळात सभा घेत होते त्यांच वेळी त्यांना सभांसाठी कोणी पैसे दिले. सभांवर किती रुपये खर्च केले असे सवाल केले जात होते. आता हाच सवाल निवडणूक आयोगाने विचारला आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात घेतलेल्या सभांचे वादळच महाराष्ट्रात उठले होते. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते देखील चौताळले होते.

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात घेतलेल्या सभांच्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे असे दिलीप शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणले आहे. दिलीप शिंदे हे महाराष्ट्राचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आहेत.

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज