हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी नुकताच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक ट्विटही केले त्यामध्ये “माफिया मुख्यमंत्री हटविल्याबद्दल अभिनंदन” असे म्हंटले. यावरून शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी सोमय्यांना टोला लगावला आहे. “कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोणीच बरोबरी करू शकत नाही,” असे साळवी यांनी म्हंटले आहे.
साळवी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कुठे गंगू तेली आणि कुठे राजा भोज. एक गोष्ट याद राखावी आमही तुम्हाला कोकणात पाऊल देखील ठेवू देणार नाही, असे म्हणत साळवी यांनी सोमय्यांना इशाराही दिला आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना प्रमुख व शिवसेनेबाबत सांगायचे झाले तर
उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणुकीबाबत कोणताही दबाव नाही. ते म्हणतील त्याच उमेदवाराला आम्ही मतदान करू. आम्ही उद्धव ठाकरे याचेच ऐकणार आहोत, असे साळवी यांनी म्हटले आहे.