‘सुरेश खाडेंना पाला पाचोळ्यासारखे मतदार उडवून लावतील’- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
‘भाजपच्या आमदारांना सत्तेचा माज आला आहे. विरोधकांना पालापाचोळा व कचरा म्हणणाऱ्या सुरेश खाडेंना मतदारच पालापाचोळ्यासारखे उडवून लावतील. त्यांची सत्तेची मस्तीच मतदारच उतरवतील’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मिरजेतील पत्रकार परिषदेत केली. यावेेळी विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, महेश खराडे, संदीप राजोबा, तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेत राजू शेट्टी म्हणाले,’भाजपला आलेली सत्तेचा माज उतरविण्याची वेळ आली आहे. हा लढा अतिशय तोलामोलाचा असून धक्कादायक निकाल लागणार आहे. आम्ही ही जागा जिंकल्या शिवाय गप्प बसणार नाही. ज्याप्रमाणे हाफिज धत्तुरे विजयी होऊन धक्कादायक निकाला लागला होता. त्याचप्रमाणे आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे. जनता आता भाजपच्या धोरणामुळे कंटाळली आहे.’ सर्वत्र बेरोजगारी आणि महागाई यामुळे जनतेलाच आता बदल हवा आहे. त्यामुळे ही लढाई तोलामोलाची असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

परिषदेत उपस्थित विशाल पाटील म्हणाले, ‘चुकीच्या माणसाला निवडून दिल्यामुळेच मिरजेचा विकास झाला नाही. आता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने ही निवडणूक लढविणार आहोत. आमच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे आरोप करून त्यांना अडकविण्यात आले आहे. यामध्ये विद्यमान आमदारांचा हात असल्याचा आरोपही विशाल पाटील यांनी यावेळी केला.

इतर काही बातम्या-