कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे. आम्हांला कोविडचा नियम अन् परवा पंढरपूरला अजितदादांची सभा झाली, त्याला कोविडचा नियम नाही. जनरल मिटिंग होणार त्याला कोविडचा नियम नाही. आम्ही आम्हांला कोविडचा नियम, आम्हांला जमावबंदी. आम्ही काय गुन्हा केला आहे. कराडला येताना आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याच काय कारण होतं. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, कुपनंच शेत खायला लागलंय, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कारखान्यांची एफआरपी जाहिर करा. राज्यातील सगळ्या कारखान्यांनी एफआरपी नाही दिली, तर काय कारवाई करणार ते सांगा. माझं आणि सहकारमंत्र्यांचा भांडण नाही. तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळाला हवा.
पुढे श्री. शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे ४० हजार कोटी येण आहे, ते सरकारने वसूल करून द्यायचे आहे. आज कुणाचं २ हजार, ५ हजार लाईटबिल थकित आहे, त्याला १८ टक्के पठाणी व्याज चालू आहे. ऐन उन्हाळ्यात पीक वाळतं चाललं आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी २ हजार रूपये थकितसाठी आत्महत्या केली. आमचं पैसे येण आहे, ते तुम्ही वसूल करू देत नाही. आम्ही वसूल करायला गेल की ताब्यात घेता. बुडवणाऱ्यांना पाठीशी घालता. आमचं वीज कनेक्शन मात्र तोडता म्हणजे राज्य सरकारचे नेमकं चाललंय काय? असा सवाल त्यांनी केला.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा