कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ५ एप्रिल पर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमीकाव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे दिला.
थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात राजू शेट्टी यांनी आज सह्याद्री कारखान्यावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. सह्याद्री कारखान्यांवर पोहोचणे अगोदरच पोलिसांनी राजू शेट्टी यांना महामार्गावर ताब्यात घेऊन कराडच्या शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात बैठक होऊन चर्चा झाली.
योवळी राजू शेट्टी म्हणाले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी १ एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहेत. १५ मार्च अखेर साखर कारखान्यांकडे २८८५ कोटी एफआरपी थकीत होती. १५ दिवसांत ५०० कोटी थकित वसुल झाली असल्याचा सहकार मंत्र्यांचा दावा आहे. आम्ही ५ एप्रिल ला साखर आयुक्तालयात जाऊन तू किती एक तारखेची साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत. तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही, तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करू. तसेच साखर आयुक्तांना घेराव घालू.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा