शिंदे-फडणवीस सत्ता बदलण्यात एक्सपर्ट, सरकार अजून तरी…; रामदास आठलेंचे सूचक वक्तव्य

Ramdas Athawale Devendra Fadnavis Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. हे सरकार अजून 20 वर्ष तरी पडणार नाही, असे आठवले यांनी म्हंटले.

पिंपरी-चिंचवड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनास मंत्री आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अनेकजण बोलत आहेत कि हे सरकार लवकरच जाणार आहे. मात्र, त्यांना एवढंच सांगतो कि, हे सरकार काही लवकर जाणार नाही. जाणार असते तर हे सरकार आले कशाला असते? हे सरकार जाण्यासाठी आलेले नाही. आताचे सरकार बदलेल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये.

यावेळी आठवले यांनी नाराजीच्या चर्चेबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सरकारमध्ये कोणामध्ये नाराजी असण्याचे काही कारण नाही. सर्वांना मंत्री पद मिळणार नाहीत. त्यामुळे मनात नाराजी असते. प्रत्येकाला वाटतं सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे पण ती मिळत नाही. मंत्री मंडळ हे 40-45 मंत्रीपदांचे असणार आहे, असे आठवले यांनी म्हंटले.