हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Ration Card द्वारे सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी आजची आपली ही बातमी महत्वाची ठरेल. कारण नुकतेच रेशन वितरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. जे जाणून कदाचित आपण अस्वस्थ व्हाल. हे लक्षात घ्या कि, दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत शिधावाटप करावे लागते. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेशनचे वाटप झालेले नाही. काही जिल्ह्यांमध्ये भारतीय अन्न महामंडळ (FCI) कडून अद्याप तांदूळ पुरवठा केला गेला नाही. त्यामुळे रेशनचा पुरवठा होत नसल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. Ration Card
रेशन मिळण्यास झाला उशीर
FCI कडून काही रेशन कोट्याच्या दुकानांमध्ये फक्त गहू, साखर, हरभरा, तेल आणि मीठच पोहोचवले आहे. रेशनच्या वितरणासाठी या दुकानांपर्यंत तांदूळ पोहोचण्याची वाट पहिली जाते आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की,” लवकरच तांदूळ दुकानांमध्ये पोहोचवला जाणार आहे. हा तांदूळ रेशन दुकानांवर पोहोचल्यानंतरच त्याचे वितरण सुरू केले जाईल. वितरण व्यवस्थेतील गडबडीमुळे कार्डधारकांना जानेवारी महिन्यातील रेशन मिळण्यास उशीर होतो आहे.” Ration Card
हे लक्षात घ्या कि, रेशन दुकानांवर तांदूळ कोटा उपलब्ध नसल्यामुळे पॉइंट ऑफ सेल्स मशीन (PoS) मधून रेशन वितरणाला परवानगी मिळत नाही. ज्यामुळे रेशनकार्डधारकांना वाट पहावी लागते आहे. मात्र भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ पुरवठा करण्यास उशीर का होतो आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Ration Card
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://fci.gov.in/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता