Wednesday, March 29, 2023

मोदी गया तो गुजरात गया; बाळासाहेबांचा ‘तो’ Video जडेजाकडून शेअर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. गुजरात मध्ये भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पहायला मिळत आहे. तत्पूर्वीच भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना विडिओ शेअर करत शेर की बात को ध्यान से सुनो… गुजराती बांधवानो अजूनही वेळ गेली नाही असं कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाष्य करताना दिसत आहेत.

- Advertisement -

मोदी गया तो गुजरात गया तो गुजरात गया हे माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला. हे माझं वाक्य मी अडवाणी जवळ बोललो आहे असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओ मध्ये बोलत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत जडेजाने भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. जडेजाची पत्नी रिवाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 2,39,76,760 मतदार असून एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत. गुजरात हा मोदी शाह यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यापूर्वी इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना व्हायचा, परंतु आता आम आदमी पक्षाने या निवडणुकीत उडी घेतल्याने गुजरात विधानसभा निवडणूक चुरशीची झाली आहे.