RBI काय म्हणाले ते जाणून घ्या RBI ने एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. NEFT सर्व्हिसची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जात असल्याचे त्यात म्हटले आहे. हा अपग्रेड 22 मे 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर होईल. यामुळे, NEFT सर्व्हिस रविवार दि. 23 मे रोजी 22 मेनंतर संध्याकाळी 12 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. ग्राहकांकडे ‘हे’ पर्याय असतील RBI च्या म्हणण्यानुसार या काळात RTGS सिस्टीम कार्यरत राहील. केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की, यावेळी RTGS (Real Time Gross Settlement) सर्व्हिस वर परिणाम होणार नाही आणि ती सामान्य पद्धतीने सुरू राहणार आहे. यापूर्वी 18 एप्रिल रोजी RTGS संदर्भात असेच टेक्निकल अपग्रेड पूर्ण झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की,” बँकांनी ही माहिती त्यांच्या ग्राहकांना अगोदरच पुरविली पाहिजे जेणेकरून त्यांना अडचण उद्भवू नये आणि त्यांनी त्यांचे काम आधीच केले पाहिजे.”NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा