Sunday, May 28, 2023

RBI चा अलर्ट ! बँकेची ‘ही’ सर्व्हिस आज रात्रीपासून 14 तास बंद ठेवली जाणार, आवश्यक कामं आधीच करून घ्या

नवी दिल्ली । आपण डिजिटल पैशांचा सौदा करत असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अशा ग्राहकांसाठी विशेष माहिती जारी केली आहे. आज रात्रीपासून ग्राहकांना रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत NEFT व्यवहार करता येणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) म्हटले आहे की, रविवारी दुपारपर्यंत NEFT सर्व्हिस उपलब्ध होणार नाही. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) हे इंटरनेट बँकिंग आणि एक टू वन पेमेंट सुविधेचे एक महत्त्वाचे फिचर मानले जाते. तथापि, कोणतीही त्वरित रक्कम भरण्यासाठी बँक ग्राहक रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) निवडू शकतात. RBI काय म्हणाले ते जाणून घ्या RBI ने एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. NEFT सर्व्हिसची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जात असल्याचे त्यात म्हटले आहे. हा अपग्रेड 22 मे 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर होईल. यामुळे, NEFT सर्व्हिस रविवार दि. 23 मे रोजी 22 मेनंतर संध्याकाळी 12 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही. ग्राहकांकडे ‘हे’ पर्याय असतील RBI च्या म्हणण्यानुसार या काळात RTGS सिस्टीम कार्यरत राहील. केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की, यावेळी RTGS (Real Time Gross Settlement) सर्व्हिस वर परिणाम होणार नाही आणि ती सामान्य पद्धतीने सुरू राहणार आहे. यापूर्वी 18 एप्रिल रोजी RTGS संदर्भात असेच टेक्निकल अपग्रेड पूर्ण झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की,” बँकांनी ही माहिती त्यांच्या ग्राहकांना अगोदरच पुरविली पाहिजे जेणेकरून त्यांना अडचण उद्भवू नये आणि त्यांनी त्यांचे काम आधीच केले पाहिजे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group