‘हे’ खाते उघडण्याच्या नियमांत RBI ने केला मोठा बदल, ग्राहकांना याचा काय फायदा होईल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) चालू खात्यातील अनेक नियमांमध्ये दिलासा जाहीर केला आहे. आजपासून नवीन नियम अंमलात आले आहेत. या नव्या नियमांनुसार 6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक आणि पेमेंट बँकांसाठी एक परिपत्रक जारी केले होते, त्यामध्ये चालू खात्याबाबत काही आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु आता या खात्यांबरोबरच अनेक खात्यांना दिलासा मिळालेला आहे.

6 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले होते, ज्यात असे सांगितले गेले होते की, ज्या ग्राहकांनी बँकिंग सिस्टममधून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट स्वरूपात क्रेडिट सुविधा घेतली आहे RBI ने अशा अनेक ग्राहकांना करंट अकाउंट उघडण्यास बंदी घातली आहे.

नवीन परिपत्रकात काय बदल झाले
त्याशिवाय या नवीन परिपत्रकानुसार, ज्या बँकेतून ते कर्ज घेत आहेत त्याच बँकेत ग्राहकांना त्यांचे करंट अकाउंट किंवा ओव्हरड्राफ्ट अकाउंट उघडावे लागेल.

https://t.co/zcpuHOTFdB?amp=1

हा नियम का जारी केला गेला?
ज्या ग्राहकांनी बँकेकडून 50 कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांसाठी हा नियम लागू होईल. रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की, बर्‍याच वेळा असे दिसून आले आहे की, ग्राहक एका बँकेतून कर्ज घेतात आणि दुसर्‍या बँकेत करंट अकाउंट उघडतात. असे केल्याने कंपनीच्या कॅश फ्लोला ट्रॅक करण्यात बरीच अडचण येते. म्हणूनच RBI ने एक परिपत्रक जारी केले आहे की, अशा बँकेने इतर ठिकाणाहून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेतलेल्या अशा ग्राहकांचे करंट अकाउंट उघडू नये.

https://t.co/nXjOUXj41u?amp=1

बँकांनीही या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत
करंट अकाउंट उघडण्याच्या या अटींमध्ये सवलत देण्याबरोबरच RBI ने ग्राहकांना सतर्क केले आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ही सूट केवळ काही अटींसह दिली जात आहे, त्यामुळे बँकांनीही याबाबत काळजी घ्यावी. याशिवाय केवळ काही विशिष्ट व्यवहारासाठीच त्याचा वापर केला जाईल अशी हमी बँका देतात. याखेरीज बँकेकडूनही याकडे लक्ष ठेवले जाईल. आरबीआयने बँकांना नियमितपणे कॅश क्रेडिट / ओव्हरड्राफ्टवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

https://t.co/tfN8hYKhtG?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment