हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank ने बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ केली आहे. 5 सप्टेंबरपासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर जास्तीत जास्त 6.25 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरा इतका आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँकेकडून सध्या आपल्या बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.50 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे SBI देखील फक्त 2.70 टक्के दराने व्याज देत आहे.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता RBL बँक आपल्या बचत खात्यात जमा केलेल्या 1 लाखांपर्यंतच्या रकमेवर 4.25 टक्के दराने व्याज देईल. त्याच वेळी, ग्राहकांना 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर वार्षिक 5.50 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, RBL Bank आता बचत खात्यातील 10 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 6 टक्के व्याज देईल.
6.25 टक्के दराने व्याज दिले जाईल
RBL Bank च्या बचत खात्यात जर एखाद्या ग्राहकाने 25 लाख ते 1 कोटी रुपये ठेवल्यास 5 सप्टेंबरपासून त्याला वार्षिक 6.25 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी यावर 6 टक्के दराने व्याज दिले जात होते. 1 कोटी ते 3 कोटी रुपयांच्या डिपॉझिट्सवर आता 6.25% व्याज मिळेल, त्यानंतर बचत खात्यात 3 कोटी ते 5 कोटी रुपये जमा करणाऱ्या ग्राहकाला बँक 6.25% दराने व्याज मिळेल.
या रकमेवरही जास्त व्याज मिळेल
त्याचप्रमाणे, आता RBL Bank कडून 10 कोटी ते 50 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 6.10 टक्के देण्यात येणार आहे. तसेच, ज्या बचत खात्यात 50 कोटी ते 100 कोटी रुपये जमा केले जातील, त्यावर वार्षिक 5.25 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच बरोबर 100 कोटी ते 200 कोटी रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर आता 6 टक्के दराने व्याज मिळेल. 200 ते 500 कोटी बचत खात्यात ठेवल्यास बँकेकडून 4 टक्के दराने व्याज दिले जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rblbank.com/product/savings-accounts/advantage-savings-account
हे पण वाचा :
LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!
CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा