…अशा गद्दारांना पाकिस्तानात पाठवा; यापूर्वीच संतांनी केली होती भविष्यवाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतरही आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडाळीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ज्या संतांची शिंदे यांच्यासोबत भेट घेतली होती. त्या संतांनीच हिंदुंमध्ये आपलेच काही गद्दार आहेत. त्या गद्दारांना आपण पाकिस्तानात पाठवले पाहिजे, अशी भविष्यवाणी केली होती.त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक मुणून ओळख असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षातील उठाव ठाकरे यांच्याशी बंड केले आहे. त्यांच्या बंडामुळे शिवसेनेचा किल्ला ढासळला आहे. तर महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तो म्हणजे या व्हिडिओत बंडखोर नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि अनेक शिवसेना नेते एका जैन संतांसमोर उभे आहेत. यात जैन संतांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मोठी भविष्यवाणी केली होती असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांना संतांनी अगोदरच संकेत दिले होते, पण आदित्य ठाकरे ते संकेत समजू शकले नाही, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक जैन संत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांना उपदेश देत आहेत. यावेळी संतांनी म्हंटले आहे की, “मुसलमानांमध्ये एवढे गद्दार नाही जेवढे हिंदुंमध्ये गद्दार आहेत. हिंदुंना धोका हा हिंदुंकडूनच आहे आणखी कुणाकडूनही नाही. आणि अशा हिंदुंना पाकिस्तानात पाठवा.” मात्र असं बोलताना जैन संतांनी थेट एकनाथ शिंदेंकडे बोट केलं आहे, ज्यामुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला असा दावा व्हायरल व्हिडिओ शेयर करणाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

मात्र, हे संत नक्की कुणाबाबत बोलले याबद्दल स्पष्टता या व्हिडिओतून होत नाही. दरम्यान शिंदे यांनी आपले बंड आणखी तीव्र केले आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्याकडून आता भाजपशी हातमिळवणी केली जाणार असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.