Reliance Jio IPO | रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्यांनी त्यांचे मोबाईल रिचार्ज नुकतेच वाढवलेले आहे. त्याचप्रमाणे कंपनी त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
मुकेश अंबानींनी जर त्यांचा IPO (Reliance Jio IPO) लॉन्च केला तर तो हा भारतातील सर्वात मोठा IPO असू शकतो. तर त्यांचे असे म्हणणे आहे की, कंपनीचा हा IPO पुढील वर्षात येऊ शकतो. माध्यमातून वृत्तानुसार आता मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्सचा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी त्याबाबतचे संकेत देखील दिलेले आहे. या IPO चा आकार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा मोठा असू शकतो. .
सध्या देशातील सर्वात मोठा IPO (Reliance Jio IPO) हा LIC चा आहे. सरकारी विमा कंपनी LIC ने 022 मध्ये हा IPO आणला होता. जो सुमारे 21000 कोटी रुपये एवढा होता. याआधी one97 कम्युनिकेशन चा विक्रम सगळ्यात जास्त होता. त्यांचा IPO हा 18, 300 कोटी रुपयांचा होता.
त्यानंतर LIC चा सर्वात मोठा IPO आहे. परंतु हा रेकॉर्ड रिलायन्स जिओ मोडू शकतो. सध्या दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई देखील IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई इंडियाने IPO साठी सेमी कडे महसुलात मसुदा देखील दाखल केला आहे. यानुसार आता ह्युंदाई इंडियाचा IPO हा 25 हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकतो.