हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने त्यावर कंट्रोल करणं अवघड होऊन बसले आहे. जगभरात कोरोना मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. त्यातच नवीन रिसर्च समोर आला आहे. कोरोना मुळे सर्वात जास्त धोका हा उंच लोकांना आहे . असा धक्कादायक खुलासा करण्यात रिसर्च मधून करण्यात आला आहे. देशात गेल्या चोवीस तासात धडकी भरवणारी आकडी समोर आली आहे. कोरोनाची संख्या १५ लाखावर गेली आहे. तर मागील चोवीस तासात ७६८ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर अत्तापर्यंत ३४ हजारावर लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या काळात सर्व स्तरातील लोक, प्रशासकीय अधिकारी आणि सरकार खूप प्रयत्न करत आहे. परंतु वाढणारी आकडेवारी हि जास्त त्रासदायक ठरत आहे. सर्वसामान्य लोकांपेक्षा जे लोक उंचीने जास्त आहेत. त्यांना कोरोनाचा धोका आहे. असं शास्त्रज्ञाचं मत आहे. ब्रिटन मॅचेस्टर युनिव्हर्सिटी अँड ओपन युनिव्हर्सिटी सह आंतराष्ट्रीय रिसर्च च्या एका टीमने याबात संशोधन केले आहे. त्यांच्या टीमने जवळपास दोन हजार लोकांचा यासाठी अभ्यास केला आहे.
ब्रिटन मॅचेस्टर युनिव्हर्सिटी अँड ओपन युनिव्हर्सिटी ने ज्या लोकांबाबत रिसर्च केला आहे त्या लोकांचं कामाचं ठिकाण , घर, पर्सनल प्रोफाइल याचा संबंध कोरोनाशी आहे का याचा अभ्यास हि करण्यात आला आहे. त्याचा परिणाम कोणत्या लोकांवर जास्त होतो. यावर अभ्यास केला असता ज्यांची उंची ६ फूट पेक्षा जास्त आहे . त्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त आहे असा निष्कर्ष काढला आहे. फक्त जमिनीवरील विषाणू मुळे कोरोना पसरत नाही. तर हवेतील ड्रॉप लेट मधून हि पसरला जात आहे. असे मॅचेस्टर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर इवान कॉंटेपेटिल्स यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.