हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान काल राज्यपालांनी निवडीवर आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेत्यांनीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या निवडी करणार असे म्हंटले. या निवडणुकीवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. आम्ही जे केले आहे ते कायदेशीर आहे. राज्यपाल आणि आमच्यात संघर्ष आहे, असे म्हंटले जात आहे. मात्र, तसे नाहीत. आमच्या निवडीनंतर कोणी कोर्टात गेले तर आम्ही आमची बाजू मांडू असे थोरात यांनी म्हंटले.
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अध्यक्ष निवडीबाबत आम्ही जे केलेय ते कायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय होईल. आम्ही कायद्याने नियम केलेले आहेत. जे लोकसभेत आहेत ते विधानसभेत केलेत, देशातील इतर सभागृहात ते नियम केलेत. कोणी कोर्टात गेले तर आम्ही आमची बाजू मांडू नक्की मांडणार आहोत. मात्र, आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही, तिन्ही पक्ष चर्चा करुन निर्णय घेतला जाणारे असल्याचे थोरात यांनी म्हंटले.
राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याने राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यात नवा संघर्ष उभा राहिला आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी ठाकरे सरकारने राज्यपालांची रितसर परवानगीही मागितली आहार. मात्र, राज्यपालांनी निवड प्रक्रियेवरच आक्षेप घेतल्याने आघाडीतील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विशेष करून काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांशिवाय आपण अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊ असा पावित्रा घेतला आहे.