व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! नागपुरात उष्माघाताने रिक्षाचालकाचा मृत्यू

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वाढत्या उकाड्यामुळे सध्या जीवाची लाहीलाही होत आहे. यामध्ये नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आनंद टॉकीजजवळ एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्ये मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली असता त्या व्यक्तीचा उष्माघातामुळे (heatstroke) मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागपूरमध्ये उष्माघाताने (heatstroke) आतपर्यंत दहा जीवांचा जीव घेतला आहे. तसेच पुढचे काही दिवस नागपूरसह विदर्भात उन्हाचा कडाका असाच कायम राहणार असल्याचे नागपूर वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.

काय घडले नेमके ?
आनंद टॉकीजजवळ पिलरखाली एक व्यक्ती मृतावस्थेत सापडला होता. या घटनेची माहिती सीताबर्डीचे पोलीस निरीक्षक अमोल कोचे यांना देण्यात आली. या व्यक्तीचा मृतदेह मेयो रुग्णालायत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस या व्यक्तीची ओळख पटवत आहेत.

हे पण वाचा : 
49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच

Kisan Vikas Patra : सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या दिवसात पैसे होतील दुप्पट

ट्रेनमध्ये मिळणार बेबी सीट; महिला आणि बालकांसाठी रेल्वेचे खास गिफ्ट

संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

योगी सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार; ‘हे’ आहे कारण