हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Accident ) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे.
Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway near Roorkee border, car catches fire. Further details awaited. pic.twitter.com/qXWg2zK5oC
— ANI (@ANI) December 30, 2022
हाती आलेल्या बातमीनुसार, ऋषभ पंत दिल्लीहून रुरकीला जात होता. दरम्यान, रुरकीच्या नरसन सीमेजवळ कार उलटली. (Rishabh Pant Accident) अपघातानंतर ऋषभ पंतला तातडीने डेहराडूनला नेण्यात आले. जिथे त्याची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या खटाटोप करत आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या भीषण अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.
पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. अशा परिस्थितीत तो दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी पंतला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे वृत्त होते. त्यातच आता या भीषण अपघातामुळे पंतचे मैदानावर लवकरात लवकर परतणे कठीण झालय.