हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या चार पक्षांमध्ये राजकीय टीका टिपण्णी केली जात असल्यामुळे राजकीय वाटेवर चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध शिवसेना आणि मनसे विरोध राष्ट्रवादी असा पक्षांतील मोठ्या नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 14 ट्विट करत थेट शरद पवारांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर आता आमदार रोहित पवारांनी ट्विट 8 ट्विट करून फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. होय! आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे!,” असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
रोहित पवार त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एका मागून एक अशी 8 ट्विट केलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी थेट फडणवीसांनी ज्या 14 ट्विटद्वारे प्रश्न विचारले आहेत. त्याला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, होय! आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे! साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता.
होय!
आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे!
साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. pic.twitter.com/kGS3UnLd2V— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत.
पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत!
जय महाराष्ट्र!— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत ! जय महाराष्ट्र !
सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून 6 दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.
राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना? असा सवालही यावेळी रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे जेव्हा शरद पवार यांच्यावर टीका केली. तेव्हा त्यांनी द काश्मीर फाइल्सवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची जी विधाने ऐकत आहोत यात आजिबात आश्चर्य नाही. किंबहुना, ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि जातीय आधारावर राजकारणा सह समाजाचे ध्रुवीकरण करतात, असा आरोप फडणवीसांनी केला होता. तसेच नवाब मलिकांवर कारवाई झाल्यानंतर मलिक मुस्लीम असल्यामुळे त्यांचं नाव दाऊदसोबत जोडलं आहे, असे पवारांनी म्हटल्याचे फडणवीसांनी ट्विटमधून सांगितले होते. अशाच प्रकारे फडणवीसांनी एकूण 14 ट्विट करून पवारांवर टीका केली होती.