हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल मुंबईत जंगी कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमणे उधळली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. “काल मुंबईतील कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!, असा टोला पवारांनी लगावला आहे.
रोहित पवार यांनी आज एका ट्विट केले असून त्यांनी त्यात म्हंटले आहे की, काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!
मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!
काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल! pic.twitter.com/NXuCGmQcQb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2023
रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. या ट्विटला आता भाजप नेते काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.