नाशिकच्या सरकारी करन्सी प्रिंटिंग प्रेसमधून पाच लाख रुपये गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । पाच लाख रुपयांच्या चोरीची खळबळजनक घटना महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या शासकीय करन्सी नोट प्रेसमधून (Currency Printing Press) समोर आली आहे. देशातील सर्वात सुरक्षित करन्सी नोट प्रेसमधून चोरी झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही प्रशासन पैसे कुठे गेले याचा तपास करत आहे. या सर्व नोटा 500 रुपयांच्या आहेत.

प्रिंटिंग प्रेसबरोबरच पोलिसही या संदर्भात शांत आहेत. मात्र पोलिसांनी अनेक पथके तयार केली असून त्यांचा तपास सुरू आहे. यासंदर्भात गुप्तचर यंत्रणाही तपास करीत आहेत. नाशिकमध्ये असलेल्या करन्सी नोट प्रेसमध्ये भारतीय चलनातल्या नोटा छापल्या जातात. एका वर्षात सुमारे अडीच हजार कोटींच्या नोटा येथे छापल्या जातात. म्हणूनच या कारखान्यास अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे.

देशात नोटाबंदीच्या वेळी कारखान्यात दिवसा आणि रात्री देखील नोटा छापल्या जात आणि देशातील नागरिकांना वाटल्या जात असत. आता या प्रिंटिंग प्रेसमध्ये हा धक्कादायक चोरीचा प्रकार समोर आला आहे.

या शासकीय करन्सी नोट प्रेसमधून या नोटा गायब झाल्यानंतर लगेचच काही काळ गोपनीय विभागीय चौकशी सुरू झाली आहे. परंतु सोमवारी प्रिंटींग प्रेसचे अधिकाऱ्यांनी उपनगरीय पोलिस ठाणे गाठले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. ही घटना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय आर्थिक बाबींशी संबंधित असल्याने प्रिंटींग प्रेस प्रशासन आणि पोलिस गप्प आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group