1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्य जीवनावर होणार थेट परिणाम

Money Count
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टींमध्ये मोठा बदल (rule change from 1st november) होणार आहे. या बदलांचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. चला तर पाहूया कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहे परिणाम

1) गॅस सिलिंडरच्या किंमतीत होणार बदल
दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर बदलत असतात. 1 नोव्हेंबरला (rule change from 1st november) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठे बदल होऊन नवे दर जाहीर करण्यात येणार आहेत. कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅसचे दर बदलत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात झालेल्या वाढीमुळे एलपीजीच्या किमतीतदेखील वाढ होऊ शकते.

2) OTP संदर्भातील नियम
LPG गॅसशी संबंधित आणखी एक नियम बदलला आहे. 1 नोव्हेंबरपासून (rule change from 1st november) घरगुती गॅस घरी पोहोचल्यानंतर OTP देणे बंधनकारक असणार आहे. जर ग्राहकाने OTP दिला नाही तर डिलिव्हरी होणार नाही. त्यामुळे ग्राहकांना आता बुकिंग करताना तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर देणे बंधनकारक असणार आहे. त्यावर OTP पाठवला जाणार आहे. तो OTP दिल्यानंतर तुम्हाला तुमचा गॅस मिळणार आहे.

3) इंश्युरन्सशी संबंधित नियम
विमा नियामक आयआरडीएआयकडून 1 नोव्हेंबरपासून (rule change from 1st november) मोठा बदल करण्यात येणार आहे. विमा कंपन्यांना 1 नोव्हेंबर 2022 पासून केवायसीचे डिटेल्स देणे बंधनकारक असणार आहे. सध्या तरी नॉन-लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसीचा तपशील देणे बंधनकारक नाही आहे मात्र १ नोव्हेंबरपासून तो बंधनकारक केले जाऊ शकतो.

4) वीजेवर सब्सिडीचा नियम
दिल्लीत 1 नोव्हेंबरपासून वीज अनुदानाचा नवा नियम लागू होणार आहे. नोंदणी न केलेल्यांना विजेवर अनुदान मिळणार नाही. 31 ऑक्टोबर शेवटची तारीख देण्यात आली होती. दिल्लीतील रहिवाशांना दरमहा 200 युनिट मोफत वीज मिळण्यासाठी नोंदणी करावी लागते.

5) GST रिटर्नवर द्यावा लागेल कोड
जीएसटी रिटर्नच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. आता पाच कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना जीएसटी रिटर्नमध्ये चार अंकी एचएसएन कोड द्यावा लागणार आहे. पूर्वी 2 अंकी एचएसएन कोड टाकावा लागत होता. यापूर्वी पाच कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना 1 एप्रिल 2022 पासून 4 अंकी कोड, त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 पासून 6 अंकी कोड टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती