हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचाकाल राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय मंडळींकडून त्यांच्याबाबत भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही; लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही…, अशा कवितेच्या ओळी लिहीत आपली भावना व्यक्त केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांप्रती आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही… लढा माझा माझ्यासाठी; लढाईला माझ्या अंत नाही… पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन असे ट्विट चाकणकरांनी केले आहे. तसेच त्यांनी मराठीत एक सुविचारही ट्विट केला आहे. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत, असे सूचक ट्विट चाकणकरांनी केले आहे.
लढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही…
लढा माझा माझ्यासाठी
लढाईला माझ्या अंत नाही…
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन@OfficeofUT pic.twitter.com/K0JxJOnjuh— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 30, 2022
दरम्यान, शिवसेनेतील प्रबळ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळे राज्यात गेली दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाले. जोरदार घडामोडीनंतर अखेर काल उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर या राजकीय नाट्यावर पडदा पडला. आता भाजपकडून नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तयारी केली जाऊ लागली आहे.